सुनील भंडारे पाटील
भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संतुलन पाषाण शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना भारतीय लोकशाही समजून उमगली जावी यासाठी संविधानाच्या प्रती वाटपकरून अनोख्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली.
आपल्या वैचारिक कार्यातून महामानव बनलेले भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे प्रत्येक देशवासीयासाठी देशग्रंथ आहे. स्वातंत्र्यानंतरही मुलभूत हक्कासाठी गोरगरिब, अंगमेनहती, अदिवासीयांना झुंझ देऊन झगडावे लागत आहे. दिवसेंदिवस वाढत्या मुस्कटदाबीमुळे आपले मूलभूत हक्क व कर्तव्य यापासून वंचित राहावे लागत असल्याने आर्थिक व सामाजिक विषमता वाढत आहे. वाढत्या विषमतेमुळे हक्क आणि कर्तव्यापासून दूर असलेला अर्धा मेला समाज वाढत असल्याची खंत वंचितासाठी रचनात्मक संघर्ष करणारे एडवोकेट बी एम रेगे व्यक्त करून समाज व्यवस्थेत सुज्ञ नागरिक तयार होण्यासाठी भारतीय राज्यघटना महत्वाची असल्याचे मत व्यक्त केले.
संतुलन संस्थेच्या संचालिका संस्थापिका एडवोकेट पल्लवी रेगे यांनी प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या मूलमंत्र्याची आठवण देऊन अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी शिक्षण आणि संघटन महत्त्वाचे असल्याचे मत मांडले.
या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर संतुलन पाषाण शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक, व दगडखान कामगार विकास परिषदेचे कार्यकर्ते सहभागी होते.